Prahar Times Adv

शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या विविध स्पर्धा जिल्ह्यात सुरु; जिल्ह्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एकूण 43 स्पर्धा होणार ; जिल्ह्यातील 6421 शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी. गोंदिया: राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षक व अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, विभाग

देवरीत राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा

देवरी : तालुका क्रीडा संकुल देवरी येथे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, अंमलात जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा (वय १७ वर्षांखालील मुलं) सन २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटक संजय पुराम, आमदार, आमगांव–देवरी विधानसभा क्षेत्र असतील. अध्यक्षस्थानी प्रजित नागर, जिल्हाधिकारी, गोंदिया राहणार आहेत. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून अभय डोंगरे (अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया), पल्लवी धात्रक(उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नागपूर विभाग), कविता गायकवाड (उपविभागीय अधिकारी व अध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल समिती, देवरी), उमेश काशिद (प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि. प्रकल्प देवरी), महेंद्र गणावीर (तहसीलदार व सदस्य, तालुका क्रीडा संकुल देवरी), प्रविण डांगे (पोलीस निरीक्षक, देवरी), आणि कु. करिष्मा वैद्य (मुख्याधिकारी, नगरपंचायत देवरी)

0
Vote Now

Did you like our plugin?

Print Friendly, PDF & Email