मोटारसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

देवरी – देवरी येथील आमगाव रोडवर मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 18 नोव्हेंबर रोजी रात्री घडली. चौकशी अहवालात , मृत तरुणाची ओळख सत्यम यशवंत उडके (वय 21, रा. परसटोला, देवरी ता. देवरी, जि. गोंदिया) अशी झाली आहे. रात्री अंदाजे 8.30 वाजताच्या सुमारास सत्यम हा पल्सर मोटारसायकलने (MH 35 AZ 1316) देवरीकडून भागी शिवार मार्गे जात असताना मोटारसायकल घसरुन तो खाली पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली.तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी फिर्यादी फिरोज लतीफ शेख (वय 34, रा. वॉर्ड क्र. 15, देवरी) यांनी देवरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, गुन्हा क्र. 45/2025, कलम 194 बी.एन.एस.एस. 2023 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चौकशी अधिकारी पो. ह.वा. ग्यानिराम करंजेकर करीत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें