रोजगार मेळावा आयोजित — नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी

देवरी – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्याता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर गोंदिया व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

हा रोजगार मेळावा दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवरी, जिल्हा गोंदिया येथे पार पडणार आहे. एकूण ४०० हून अधिक पदांसाठी भरती केली जाणार असून CIE Automotive India Ltd., Laxmi-Agni Forgings Pvt. Ltd., Eaton Pvt. Ltd. तसेच L&T Construction Skill Training या नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

ITI सर्व ट्रेड, पदवीधर व ५वी ते १२वी उत्तीर्ण तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड, मोफत वसतिगृह, गणवेश, बस सुविधा व इन्शुरन्स कव्हर अशा आकर्षक सुविधांचाही लाभ मिळणार आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें