भागी/ शिरपूर येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

प्रहार न्यूज नेटवर्क| भुपेन्द्र मस्के
देवरी;देवरी तालुक्यातील भागी/ शिरपूर येथील ग्रामस्थांनी वाघ नदीच्या नाल्यावर लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली आहे. श्रमदानातून उभारण्यात आलेला बंधारा गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वरदान ठरणार आहे. नाल्यावर बंधारा नसल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला.

ग्रामस्थांनी साठवलेल्या पाण्यामुळे गावातील विहरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. हा वनराई बंधारा बांधण्यासाठी गावातील सरपंच पुष्पाताई राऊत, पार्थव राऊत, अस्मिता कोसरे, गिता राऊत, छाया कापसे सुरेश मडावी, विलाश मानकर , लक्ष्मी मानकर ,शालु खरवडे, उपसरपंच अर्जुन भोयर , , जगदीश राऊत रोजगार सेवक , निर्मल किरसान, हितेश खरवडे, कैलाश कोल्हारे (उमेद प्रभाग समन्वयक ), ज्योत्सना गावळ (उमेद सीआरपी ) , रिना मेश्राम (सीआरपी )कल्पना खरवडे (कृषीसखी ) कमला कापसे
खिमाक्षी भोयर (लेखापाल )
आश्रमशाळेचे नाईक सर , हुमने सर
लेकचंद राऊत (शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ) राधेश्याम कोरोंडे विलाश मासरकर , विलाश ओंकार , ईश्वरदास भोयर , ओमराज राऊत , वंदना कापसे कौशल राऊत ,टिनु राऊत यांच्यासह विद्यार्थी व बचत गटाच्या महिला सदस्या उपस्थित होते.
यावेळी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी झामरे, विस्तार अधिकारी मुनेश्वर , व ग्राम विकास अधिकारी टि.आर. वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. ग्रामस्थांसह विद्यार्थी, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें