♦️जनसेवेचा ध्यास आणि विकासाचा संकल्प: आमदार संजयदादा पुराम यांचा कार्यप्रवास
आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असणारे, तळागाळातील सामान्य नागरिक, शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर हिरिरीने धावून जाणारे लोकनेते आमदार संजय पुराम यांचा आज वाढदिवस. मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या सुखा-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे.
पायाभूत सुविधा आणि दळणवळणाला गती वाघनदीवरील पुलाला मंजुरी: क्षेत्रातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेऊन आमगाव-सालेकसा मार्गावरील वाघनदीवर २५ कोटी रुपये निधीतून भव्य पुलाच्या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली आहे. प्रत्यक्षात या पुलाचे काम आता वेगाने सुरू झाले असून, यामुळे परिसरातील दळणवळण सुलभ होण्यासोबतच व्यापाराला व नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाला मोठी चालना मिळणार आहे.
शेती आणि सिंचनासाठी ऐतिहासिक प्रयत्न, ३० वर्षांची प्रतीक्षा संपवली
सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी उपसा सिंचन प्रकल्पाचा प्रश्न तब्बल ३० वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार संजयदादा पुराम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागून सुमारे २०० एकर शेतीला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे आदिवासी व स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. आदिवासी संस्कृती, भाषा आणि रोजगाराचे रक्षण अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘स्वतंत्र आयोग’ स्थापन करून घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
गोंडी भाषेला सन्मान गोंडी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व ८ व्या अनुसूचित समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा केला. स्थानिक तरुणांना रोजगाराचे प्राधान्य शासकीय आश्रमशाळांमधील पदभरतीमध्ये स्थानिक युवक-वतींना प्राधान्य मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाकडे सातत्याने निवेदन व पाठपुरावा करून स्थानिक रोजगाराचा मार्ग सुकर केला. ‘जनता दरबार‘ आणि प्रत्यक्ष लोकसंवाद
लोकप्रतिनिधी हा जनतेच्या पाठीशी सदैव उभा असला पाहिजे या भावनेतून तालुकास्तरावर ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांच्या तक्रारी व समस्या तात्काळ सोडवण्यावर त्यांचा भर असतो. वैयक्तिक मदत असो वा सार्वजनिक विकासकामे,आमदारांचे द्वार सर्वसामान्यांसाठी २४ तास उघडे असते.
भविष्यातील स्वप्न आणि ध्येय कुवाढास मध्यम सिंचन प्रकल्प सालेकसा तालुक्यातील कुवाढास मध्यम सिंचन प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसरातील शेतीला समृद्ध करणे. आमगाव ते चांदसूरज रस्ता आमगाव ते चांदसूरज रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करून नागरिकांना चांगला व सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देणे.
“सार्वजनिक विकास कामे करणे, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणे आणि वैयक्तिक विकासाची कामे करणे हे अविरत सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहील. सालेकसा तालुक्यातील कुवाढास सिंचन प्रकल्प व आमगाव–चांदसूरज रस्ता लवकरात लवकर पूर्ण करणे हे माझे स्वप्न आहे.”
— आ. संजय पुराम
आमगाव-देवरी
आदिवासी बहुल मतदारसंघाला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नरत मा. आमदार संजयदादा पुराम यांना वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!








