विजेत्यांना हजारोंची रोख पारितोषिके; ग्रामीण भागातील युवक-युवतींना धावण्याची मोठी संधी
देवरी : ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा संस्कृती आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने कमांडो फिजिकल अकॅडमी, सुरतोली / लोहारा व तक्षशिला बहुउद्देशीय संस्था, पुराडा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरतोली येथे भव्य मेगा मॅरेथॉन स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला सकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेमध्ये पुरुष खुला गट ११ किलोमीटर, महिला खुला गट ८ किलोमीटर तसेच १४ ते १७ वयोगटातील मुलांसाठी ८ किलोमीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
आकर्षक रोख पारितोषिके :
पुरुष खुला गट ११ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११,१११ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५,५५५ रुपये व तृतीय क्रमांकासाठी २,२२२ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
महिला खुला गट ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ५,५५५ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३,३३३ रुपये व तृतीय क्रमांकासाठी १,१११ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. इतर स्पर्धकांसाठी नोंदणी शुल्क केवळ ५० रुपये ठेवण्यात आले आहे.
दूरवरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील सुप्त क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे, युवकांनी मोबाईलच्या दुनियेतून बाहेर पडून मैदानाकडे वळावे आणि भविष्यात पोलीस, सैन्यदल व इतर शासकीय सेवांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धावण्याची प्रेरणा मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
या भव्य मेगा मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कमांडो फिजिकल अकॅडमी, सुरतोलीचे संचालक रोशन अशोकराव दुबे तसेच तक्षशिला बहुउद्देशीय संस्था, पुराडाचे संचालक भूमेश विठोबाची साखरे आणि दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क : ९३२५६७२३५४ / ७८७५२०४१३६







