विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा देवरीत

देवरी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव पुरस्कार सोहळा – २०२६ येथील श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था, मॉ धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि देवरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने ०४ जानेवारीला धुकेश्वरी मंदिराच्या सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित केला आहे.
या राज्यस्तरीय सोहळ्यात कृषिभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षिका पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार, दर्पण पत्रकारिता पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, नारीरत्न पुरस्कार, ग्राम भूषण ( आदर्श सरपंच ) पुरस्कार, सहकार भूषण पुरस्कार, प्रशासकरत्न पुरस्कार, भारतीय संस्कृती रक्षक पुरस्कार आणि सेवाभाव भूषण पुरस्कार असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ व्यक्तींचा शाल, श्रीफळ, रजत पदक, स्मृती चिन्ह आणि प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर असून ईमेल – mbuvs2021@gmail.com, वेबसाईट – smbuvs.in येथे नामांकन अर्ज भरु शकतात.
तरी इच्छुक व्यक्तींनी १० डिसेंबरच्या आत जास्तीत जास्त संख्येने अर्ज करण्याचे आवाहन ॲड. प्रशांत संगीडवार, कुवरलाल भेलावे, सुशील शेंद्रे, डॉ. घनश्याम निखाडे, प्राचार्य मुकेश तरोणे, जुबीन खान, सुरेश साखरे, सुरेश चन्ने, सुनील चोपकर, राजकुमार शाहू, मधुकर शेंद्रे, सुरेश भदाडे, संजय तरोणे, संजय मलेवार, बापू निर्वाण, हितेश हटवार, संदिप गायधने आदी तिन्ही संस्थेच्या पदाधिकारी वर्गाने केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें