नगरपंचायत देवरी कडून नागरीकांनकरीता शव शितपेटी व्यवस्था व गडर सफाई यंत्र या वाहनाचे लोकार्पण

■ नगरपंचायतच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन

देवरी: नगरपंचायत देवरी क्षेत्रातील व शेजारील खेडे गावातील जनतेच्या परिवारातील मृत्यक व्यक्तीच्या मृत्य देहाचे तात्पुर्ता सोय सुविधा करीता नगरपंचायत देवरी च्या वतिने शव शितपेटी ची निःशुल्क व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नगरपंचायत देवरीला शासना कडून प्राप्त गडर सफाई यंत्र या वाहनाचे सोमवार(ता.१३ जुलै) रोजी नगरपंचायत देवरी येथे शहरातील जनते समोर या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगीकार्यक्रमा मध्ये नगरपंचायत देवरीचे अध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, नगर सेविका सिताबाई रंगारी, कौशल्याबाई कुंभरे, नगरसेवक रितेश अग्रवाल यांच्यासह नगरपंचायत चे प्रशासकिय अधिकारी कु. जागृती रणदिवे व सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें