नागपूर: विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांतील ४४५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. गडचिरोलीतील चार तालुक्यांतील मतदान केंद्रावर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.
या निवडणुकीसाठी एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदारांची नोंदणी होती. त्यापैकी १ लाख ६५ हजार ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विभागातील एकूण मतदानाची अंतिम टक्केवारी ६४.८२ टक्के नोंदविण्यात आली.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात ६०.३५ टक्के, भंडारा जिल्ह्यात ६७.०७ टक्के, गोंदिया जिल्ह्यात ७१.२९ टक्के, वर्धा जिल्ह्यात ६८.३५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ७३.०५ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदान झाले. या आकडेवारीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक, तर नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली.








