देवरी तालुक्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची परीक्षा उत्साहात संपन्न

९६५ परीक्षार्थींचा सहभाग; ७७५ महिला व १९० पुरुष परीक्षार्थी परीक्षेला प्रविष्ट

देवरी, दि. २५ ऑक्टोबर २०२६ : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देवरी तालुक्यातील १०४ परीक्षा केंद्रांवर रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या परीक्षेला एकूण ९६५ परीक्षार्थी प्रविष्ट झाले. यामध्ये १९० पुरुष आणि ७७५ महिला परीक्षार्थींचा समावेश होता. गटशिक्षणाधिकारी गणेश टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक नियोजन, केंद्रांवरील व्यवस्था आणि परीक्षा प्रक्रियेच्या अनुषंगाने तालुका समन्वयक उमेश भरणे यांनी योग्य नियोजन करून आवश्यक कार्यवाही केली.
या परीक्षेच्या आयोजनासाठी डी. टी. कावळे, आर. टी. शेंद्रे तसेच सर्व विषय साधनव्यक्ती, केंद्रप्रमुख, विशेष शिक्षक आणि शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून निरक्षर व्यक्तींना साक्षरतेच्या प्रवाहात आणून त्यांना वाचन, लेखन व संख्याज्ञानाची कौशल्ये प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देवरी तालुक्यात परीक्षेला मिळालेला प्रतिसाद हा साक्षरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें