नगरपंचायतच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
देवरी: नगरपंचायत देवरीच्या वतिने देवरी शहरातील विविध शाळा, कॉलेज मधील शैक्षणीक सत्र २०२५-२६ या वर्षात इयत्ता १० व १२ वी वर्गातील उतिर्ण गुणवंत एकूण ५० विद्यार्थ्याचे नगरपंचायत देवरी कडुन शिल्ड व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले व पुढिल वाढचालीस शुभेच्छा देण्यात आले. तसेच गुणवंत विद्याथ्यांच्या पालकांचे व शिक्षकांचे ही सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमा मध्ये नगरपंचायत देवरीचे अध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, नगर सेविका सिताबाई रंगारी, कौशल्याबाई कुंभरे, नगरसेवक रितेश अग्रवाल यांच्यासह नगरपंचायत चे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच देवरी येथील मनोहरभाई पटेल हॉयस्कुल, जिल्हा परिषद हॉयस्कुल , बाबुराव मडावी हॉयस्कुल , कमलादेवी जैन हॉयस्कुल, व छत्रपती शिवाजी हॉयस्कुल येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकगण व शालेय विद्यार्थी तसेच गावातील नागरीक यांनी सक्रिय सहभाग घेतला.








