महिलांना शेतीपयोगी साहित्याचे वाटप होणार!
देवरी- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, गोंदिया जिल्हा यांच्या वतीने दि. 22 जुलै रोजी ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम देवरी तालुक्यातील पुराडा येथे आमदार संजय पुराम यांच्या निवास स्थानी आणि तिरोडा येथील रेल्वे स्टेशनजवळील अटल बिहारी सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्यात महिला शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करत त्यांना प्रत्यक्ष शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये महिलानां एक विळा, गांडूळ खत, रासायनिक खत आणि ५ प्रकारच्या विविध बियाण्यांचे पाकीट भेट म्हणून देण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासह कृषी क्षेत्रात त्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चा गोंदियाच्या जिल्हाध्यक्ष तुमेश्वरी बघेले आणि जिल्हा प्रभारी तथा माजी सभापती सविता पुराम यांच्या पुढाकाराने व निमंत्रणावरून करण्यात आले होते. या प्रसंगी भाजप महिला मोर्चाचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि तिरोडा परिसरातील शेतकरी महिला उपस्थित होणार आहेत.








