देवरी | प्रहार टाईम्स
लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तालुका देवरी यांच्या वतीने २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘जनसेवा सप्ताहा’अंतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
दि. २२ जुलै २०२६, बुधवार
सकाळी ११.०० वाजता स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात येणार असून, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्मृतींना अभिवादन करण्यात येईल.
स्थळ : सी. के. बिसेन यांचे कार्यालय, देवरी यानंतर दुपारी १२.३० वाजता ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे.
दि. २३ जुलै २०२६, गुरुवार
सकाळी ११.०० वाजल्यापासून विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
वृक्षारोपणाची ठिकाणे :
१. नगरपंचायत कार्यालय, देवरी परिसर
२. मा. धुकेश्वरी मंदिर परिसर
३. जिल्हा परिषद हायस्कूल, देवरी परिसर
४. पोलीस स्टेशन, देवरी
५. तहसील कार्यालय, देवरी
दि. २४ जुलै २०२६, शुक्रवार
सकाळी ११.०० वाजता राधिका हॉटेल येथून चिचगड येथे जाण्यासाठी प्रस्थान करण्यात येईल. यानंतर स्वच्छता अभियान व इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
स्थळ : राम मंदिर, वांढरा (चिचगड)
दि. २५ जुलै २०२६, शनिवार
सकाळी ११.०० वाजता ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्थळ : मौजा ककोडी
दि. २६ जुलै २०२६, रविवार
सकाळी ११.०० वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थळ : जिल्हा परिषद हायस्कूल इमारत, देवरी
दि. २७ जुलै २०२६, सोमवार
शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
वेळ : सकाळी ११.०० वाजता
स्थळ : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, कन्हाळगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तालुका देवरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








