देवरी तालुक्यातील ग्रामीण भागातील उज्ज्वल यशोगाथा!

उजैन भैयालाल नंदेस्वर यांची तिहेरी शासकीय निवड

देवरी |प्रहार टाईम्स

देवरी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवा अभियंता उजैन भैयालाल नंदेश्वर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकाच वेळी तीन महत्त्वाच्या शासकीय पदांसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण देवरी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.

उज्जैन नंदेस्वर यांची पुढील पदांसाठी निवड झाली आहे:

  • महाराष्ट्र भूमी अभिलेख विभाग – Surveyor (Land Records)
  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) – Assistant Engineer (Civil)
  • SSC Junior Engineer (BRO) – Junior Engineer (Border Roads Organisation)

ग्रामीण परिस्थितीतून शिक्षण घेत सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी मानली जात आहे.

उजैन नंदेस्वर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि देवरी तालुक्यातील नागरिकांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें