मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुराडा येथे ‘देवाभाऊ माऊली कृषी सोहळा

एकल शेतकरी महिलांना कृषी साहित्याचे वाटप; सविता पुराम यांचा स्तुत्य उपक्रम

जिल्हाभर राबविणार ‘देवाभाऊ माऊली कृषी सोहळा’ – सविता पुराम

देवरी :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील पुराडा येथे ‘देवाभाऊ माऊली कृषी सोहळा’ आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकल शेतकरी महिलांना शेतीसाठी उपयुक्त कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले.

सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असून, एकल शेतकरी महिलांना शेतीकामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भाजप आमदार संजय पुराम यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषद सदस्या व माजी बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना कृषी साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना सविता पुराम यांनी ‘देवाभाऊ माऊली कृषी सोहळा’ हा उपक्रम केवळ पुराडा परिसरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. एकल शेतकरी महिलांना शेतीच्या कामात आधार मिळावा आणि त्यांच्या कष्टाला बळ मिळावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला नगर उपाध्यक्षा प्रज्ञाताई संगीडवार, नगरसेविका पिंकी कटकवार, नूतन कोवे, अंबिका बंजार, माजी सभापती, सरपंच अंजू बिसेन, पंचायत समिती सदस्या ममता अंबादे, शिल्पा बांते, भाजप महिला महामंत्री प्रभा सलामे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

एकल शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें