देवरी: गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फूड प्रोडक्शन, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस, ऑटोमोबाईल्स व व्हीलर या प्रशिक्षणांसाठी इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण युवकांसाठी विशेष प्रशिक्षण व भरती अभियान राबविण्यात आले. गौरव भामरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या संकल्पनेतून, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, कॅम्प देवरी, तसेच अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी चानुपकर, श्गणेश वनारे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी, सपोनि. श्मुकेश राठोड व ओमप्रकाश गेडाम, MPOP, यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
या भरती प्रक्रियेत १०० ते १५० युवक-युवतींनी सहभाग घेतला, त्यापैकी सुमारे ४० युवकांनी प्रशिक्षण घेण्याची इच्छा दर्शविली.या प्रशिक्षण प्रक्रियेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नक्षल सेल, गोंदिया येथील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष योगदान दिले. तसेच मेळाव्यास उपस्थित असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
— प्रहार टाईम्स, देवरी








