ब्लॉसम स्कूल येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी;

♦️विद्यार्थ्यांनी साकारला गुरूंच्या संस्कारांचा जागर

देवरी: ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे गुरु पौर्णिमा उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षक वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , नामदेव अंबादे , नितेश लाडे , राहुल माहूर्ले , भोजराज तुरकर आणि विश्वप्रीत निकोडे यांची उपस्थिती होती.

गुरु पौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी विशेष उत्साहाने गुरूंच्या वेशभूषेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गुरूंचे महत्त्व, शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदान आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व यावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून गुरूंबद्दलचा आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी वेदिका फुंडे आणि अद्वी मिश्रा यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने केले. त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे कार्यक्रमाला सुंदर आणि शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी मुख्याध्यापक डॉ. सुजित एच. टेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गुरु केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देऊन त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सदैव आदर करावा आणि त्यांच्या मार्गदर्शनातून उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा.”

कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता, संस्कार आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें