देवरी: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून ‘आरोग्यावर बोलू काही’ ही विशेष व्याख्यानमाला उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागर निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत ५वी ते १०वीच्या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून डॉ. संगीता लक्ष्मीकांत चांदेवार (लक्ष हॉस्पिटल, देवरी) यांनी विद्यार्थिनींना मूलभूत आरोग्य, स्वच्छता, संतुलित आहार आणि मानसिक स्वास्थ्य याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यासह वैशाली मोहुर्ले, सरिता थोटे, संगीता काळे व रविना मुनेश्वर यांनीही विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर उपयुक्त माहिती दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा निर्माण झाली. विद्यालयामार्फत अशा उपक्रमांचे आयोजन करून सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशासाठी तेजस्विनी नंदेश्वर, योगिता कोसरकर, मनीषा काशीवार, आरती चौधरी , आचल भगत यांनी सहकार्य केले.









