विदर्भात गोंदियात सर्वात कूल @ ९.६

गोंदिया :मागील आठवड्याभरापासून तापमानाचा पारा सातत्याने घसरच चालला आहे. अचानक थंडीची लाट सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यासह दैनंदिन कामावरही परिणाम पडत आहे. विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा सर्वात कूल म्हणून नोंदविण्यात आला आहे. विदर्भात सर्वात कमी तापमान ९.६ अंश सेल्सिअस गोंदियाचा नोंद आहे.

मागील काही दिवसांपासून थंडीचा चोर वाढत चालला आहे. जिल्ह्याचा तापमान सतत घसरत चालला आहे. अचानक थंडीचा जोर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचा चांगला त्रास सहन करावा लागत आहे. आज गोंदिया जिल्ह्याचा तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. हा तापमान विदर्भात सर्वात कमी आहे. सर्वात हॉट म्हणून ओळखला जाणारा गोंदियाची आता सर्वात कूल म्हणून ओळख होऊ लागली आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम पडू लागले आहे. सर्दी, खोकला व तापाचे रुग्णात वाढ होत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत तर सायंकाळी ५ वाजेपासून थंडीचा जोर जाणवत आहे. त्यामुळे गरम उबदार कपड्यांचा नागरिकांना आधार घ्यावा लागत आहे. एवढेच नव्हेतर घरोघरी तसेच चौका-चौकात नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांमध्येही चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें