आदिवासी विकास महामंडळ संचालक पदाच्या निवडणुकीत दुधनाग व ताराम यांचा दणदणीत विजय

देवरी: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदाच्या नागपूर,वर्धा,भंडारा व गोंदिया मतदार संघातून प्रथमच दोन संचालक पदाच्या जागांसाठी शुक्रवारी (ता.१४ नोव्हेंबर) रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता.१६ नोव्हेंबर ) रोजी नाशिक येथे पार पडली. त्यात दोन्ही संचालकांच्या जागांवर भरतसिंग दुधनांग व रमेश ताराम यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा निकाल जाहीर होताच देवरी येथे विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
यात सविस्तर असे की, या-ना-त्या कारणाने आदिवासी विकास महामंडळ संचालकांची पंचवार्षिक निवडणूक लांबल्याने गेल्यावेळी पाच वषार्साठी निवडून दिलेल्या संचालकांनी तब्बल १७ वर्षे कारभार बघितला. एवढ्या अवधीनंतर झालेल्या या – निवडणुकीत त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले. मातब्बर उमेदवार व नेत्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणास लागली होती.
या निवडणूकीत आदिवासी संस्थेचे अडी अडचणी सोडविण्यासाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा गोंदिया जिल्हा संघाच्या “परिवर्तन पँनल” चे दोन उमेदवार रमेश ताराम व शंकर मडावी यांचा आणि स्वतंत्र उमेदवार भरतसिंग दुधनांग असे एकूण तिन उमेदवार या निवडणूक रिंगणात होते.
नाशिक येथे पार पडलेल्या मतमोजणीत एकूण ९२ वैध मतांची संख्या होती. यात भरतसिंग दुधनांग यांना ३६ मते तर रमेश ताराम यांना ३५ मते आणि शंकर मडावी यांना २१ मत मिळालीत. त्यात भरतसिंग दुधनांग व रमेश ताराम हे विजयी झाले आहेत. या निवडणूकीत शंकर मडावी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
या निवडणूकीत भरतसिंग दूधनाग व रमेश ताराम (नागपूर, भंडारा वर्धा व गोंदिया), निवडून आले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया नाशिक चे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, संभाजी निकम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पार पाडली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें