देवरी नगर स्थापना दिन उत्साहात साजरा , बिरसा मुंडा नगरचे लोकार्पण संपन्न

देवरी – येथील स्थानिक बिरसा मुंडा शक्ती मैदान येथे , बिरसा मुंडा यांचा १५० वे जयंती निमित्त देवरी नगर स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले , यादरम्यान देवरी येथे भव्य रैली काढण्यात आली होते.संजू उईके नगराध्यक्ष देवरी नगर पंचायत यांच्या नेतृत्वात रैली व सभेचे आयोजन करण्यात आले होते . रैलीची सुरुवात सक्ती मैदान पासून तर बौद्ध विहार , पंचशील चौक , मानकर वाडा , प्रधान वाडा , जय सेवा चौक ते आमगाव रोड मार्गे महामानव बिरसा मुंडा नगर प्रभाग एक मध्ये बहुसंख्य लोकांच्या उपस्थित बिरसा मुंडा नगरचे लोकार्पण थाटात करण्यात आले , त्यानंतर महाराणी दुर्गावती चौकात आदिवासी सांस्कृतिक सामूहिक नेतुत्व करण्यात आले , यावेळी नगराध्यक्ष संजू उईके , प्रज्ञाताई संगीडवार , तनुजाताई भेलावे ,नूतनताई सयाम , मोहन डोंगरे , पंकज शहारे ,शकील कुरेशी प्रामुख्याने उपस्थित होते .
सभे दरम्यान देवारीचा खरा इतिहास यावर चर्चा करण्यात आले , नगराध्यक्ष उईके यांनी देवरी च्या मानक लोगो मध्ये धुकेश्वरीचे घोडे असणारे चित्र येणाऱ्या वार्षिक सभेत ठराव घेऊन बदल करण्याचे आस्वासन दिले , दुसरा शक्ती मैदान , शिवशक्ती मैदान येथील प्रन्न लवकर शोडवण्याचे आश्वसन दिले आहे . सभेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून लोकनाथ तितराम , मधुकर मानकर , अंबिकाताई बंजारा , शामकला गावळ , भारतीताई सलामे ,देवकीताई मरई , टीकाराम मातवारे , सरपंच राऊत उपस्थित होते , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा मधू दिहारी , प्रस्थाविक लोकेश ताराम , आभार अनुप नळपते यांनी मानले

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें