ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे बालदिन साजरा

देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे आज बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजा व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित एच टेटे, शिक्षक नामदेव अंबादे, वैशाली मोहुर्ले , नितेश लाडे मंचावर उपस्थित होते.

या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया बद्दल जनजागृती नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांसाठी विशेष बालदिन संदेश देण्यात आला. यावेळी शाळेतील वातावरण मुलांच्या हास्याने आणि आनंदाने भरून गेले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य व शिक्षकवर्ग यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निया तिवारी, रुचिका बावनकर हिने केले तसेच यशासाठी सांस्कृतिक विभागाच्या शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें