देवरी – आमगाव विधानसभा क्षेत्रातील आमदाराचे गाव म्हणून ओळख असलेल्या पुराडा येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या महिला ग्रामसभेत गुरुवार (ता.13) रोजी जि . प .सदस्य सविता पुराम व सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम यांच्या पुढाकाराने गावातील महिलांनी दारूबंदीचा एकमुखी ठराव मंजूर करून घेत विकास कामांसाठी एल्गार पुकारला.
अवैध दारूमुळे गावातील शांतता बिघडत असल्याने व बऱ्याच परिवाराला याचा फटका बसत असल्याने गावातील महिलांनी आज ग्रामसभेत दारूबंदीचा विशेष ठराव घेतला. यावेळी आयोजित ग्रामसभेत अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी शंकर मडकाम हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा परिषद सदस्य सविताताई पुराम तसेच सालेकसा पोलिस स्टेशन चे ठाणेदार भूषण बुराडे उपस्थित होते.यावेळी सविता पुराम यांनी दारूविक्री व सेवनामुळे सामजिक व आर्थिक आणि कौटुंबिक समस्येवर प्रकाश टाकताना म्हटले की, महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले असून प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे स्त्रीला नवनिर्मितीचे सृजनशील निसर्गर दत्त वरदान लाभले असून ती कुटुंब, समाज, राष्ट्र उभारणीचे आदर्श कार्य करून गावातच स्वर्ग निर्माण करू शकते.व्यससनाधिनतेचा महिलांनी प्रतिकार केला पाहिजे.त्यासाठी गावातील तरुणांनी सुद्धा महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.असे प्रतिपादन सविता पुराम यांनी केले.ठाणेदार भूषण बुराडे यांनी दारूबंदी साठी संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन देताना म्हटले की,गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कार्य दारूमुळे होत असते.गावातील उत्पन्न वाया जाते.आणि महिलांवर शारीरिक व मानसिक अत्याचार वाढतात.त्यामुळे गावपातळीवर दारूबंदी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
Sabhechya अखेरीस सर्वानुमते ठराव करण्यात आला की गावात दारूबंदी राबविण्यासाठी जनजागृती मोहीम रबिले जाईल तसेच बेकायदेशीर दारू विक्री बाबत तक्रारी तात्काळ पोलीस व ग्रामपंचायतीकडे दिल्या जातील.
ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मी शंकर मरकाम व ग्रामपंचायत अधिकारी सचीन शहारे यांनी महिला ग्रामसभेतील निर्णयाचे स्वागत करीत प्रशासनाच्या सहकार्याने या मोहिमेला गती देण्याचे आश्वासन दिले.यावेळी गावातील शेकडो महिला व पुरुष मंडळी ग्रामसभेत उपस्थित होते.








