बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत देवरी बस स्थानकाची पथका द्वारे पाहणी

देवरी: हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत मंगळवार (ता.१० नोव्हेंबर ) रोजी चौकशी पथकाने देवरी बस स्थानकाची भेट देवून पाहणी केली.
या पाहणीत पथकाने बसस्थानक परिसरातील स्वच्छता, परिसरातील प्रसाधन गृह, हिरकणी कक्ष,प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व चालक वाहकांचे विश्रामगृह आदि विविध मुद्दयावर प्रवाशी तसेच शहरातील प्रतिष्ठीत लोकांशी चर्चा केली. नंतर देवरी बस स्थानकास मार्क (गुण) दिले.
या तपासणी पथकात राज्य परिवहन विभागाचे वर्था येथील विभाग नियंत्रक भगवान जगनोर, वर्था येथील विभागीय कर्मचारी अधिकारी राजू करपते, साकोलीचे आगार व्यवस्था सचिन आगरकर यांचा समावेश होता.या प्रसंगी देवरी बसस्थानकाचे वाहतुक नियंत्रक जी.बी. वाढीवा, देवरीचे सेवानिवृत्त प्राचार्य के. सी.शहारे,पत्रकार नंदूप्रसाद शर्मा आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें