पोलीस दाम्पत्यांचा भीषण अपघात, पत्नी ठार तर पती गंभीर

देवरी: तालुक्यातील नवाटोला परिसरात राष्ट्रीय महामार्गावर पोलीस दाम्पत्याला झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक महिलेचे नाव गीता प्रशांतकुमार श्रीवास्तव (वय ५०) असे आहे. तर गंभीर जखमी प्रशांतकुमार श्रीवास्तव हे सेलू पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील बँक ऑफ इंडिया कॉलनीतील रहिवासी श्रीवास्तव दांपत्य नातेवाईकांचे लग्न समारंभ आटपून कार क्र.एम.एच.३३ ए एस १०२० ने दोघेच रायपूर वरून वर्धेला जात असताना सोमवारला दुपारी ३:०० वाजता देवरी जवळील नवाटोला शिवारात भरधाव वेगात कार अनियंत्रित होऊन रस्त्याखालील खड्ड्यात झाडाला जावून आदळली. यात प्रशांतकुमार श्रीवास्तव यांची पत्नी गीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक प्रशांत कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे

अपघातात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आला आहे. पोलीसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें