वीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त शासकीय सेवक व सेवानिवृत्तांचा गौरवसमारंभ उत्साहात संपन्न

देवरी: बिलारगोंदी, शेडेपार येथे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान, स्वातंत्र्यसेनानी वीर बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक ऐक्य, युवकांमधील प्रेरणादायी भावना आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प यांचा संगम झालेल्या या कार्यक्रमात गावातील शासकीय सेवेत कार्यरत मुला-मुलींचा व निवृत्त मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

गावातील अनेक तरुणांनी विविध शासकीय सेवेत नाव कमावले असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तरुणाईपुढे सकारात्मक आदर्श उभा करणे आणि पुढील पिढीला शैक्षणिक जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

दीर्घकाळ शासकीय सेवेत योगदान देत गाव आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या अनुभवावर प्रकाश टाकत गावातील ज्येष्ठांनी त्यांच्या कार्याचे कौतुक व्यक्त केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें