शेतीच्या रस्त्याच्या वादातून काढीने मारहाण; एक जखमी

देवरी: तालुक्यातील लोहारा मोहनटोला परिसरात शेताच्या शिवधुऱ्याच्या वादातून मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमराज ताराचंद येरपुडे (वय ४२, रा. मोहाटोला/लोहा रा, ता. देवरी, जि. गोंदिया) व आरोपी शंकर लिंगुजी राऊत(वय अंदाजे ४८, रा.मोहनटोला /लोहारा, ता. देवरी) यांची शेती एकमेकांना लागून आहे. शेतीच्या कामासाठी येजा करण्यासाठी कित्तेक वर्षापासून शिवधुऱ्याचा वापर करण्यात येतो परंतु आरोपीने शिवधुऱ्यावर काटेरी कुंपण करून येजा करण्याचा रस्ता अडविला त्यामुळे फिर्यादीला शेतात ये जा करायला रस्ता नाही त्याबद्दल विचारणा केली असता आरोपीने जिवघेना हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली.

दि. ०९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ ते ६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या शेतात गेले असता आरोपीने शिवधुरावर ठेवलेल्या काट्या काढून टाकल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत हातातील काठीने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले.या प्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांन्वये अपराध क्रमांक ११२/२०२६ कलम. ११८(१) ३५१ (२). ३५२ भा.न्या. सहिता २०२३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस शिपाई विनोद बिसेन (बकल नं. १४०३) देवरी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें