भाजप महिला आघाडीतर्फे घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार

देवरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, देवरीच्या वतीने समाजातील कष्टकरी महिलांच्या योगदानाची दखल घेत एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक भाजप कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात घरकाम करणाऱ्या १० महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पं.स.सदस्य श्यामकलाताई गावड या होत्या. तर विशेष मार्गदर्शक म्हणून माजी महिला बाल कल्याण सभापती सविताताई पुराम,जी. प .सदस्य कल्पनाताई वालोदे ,उपाध्यक्ष न. पं. प्रज्ञाताई संगीडवार, शहराध्यक्ष लताताई बडोले या मंचावर उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना सविता पुराम म्हणाल्या की, “घरकाम करणाऱ्या महिला कौटुंबिक आणि सामाजिक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. दुसऱ्यांच्या घराची जबाबदारी सांभाळताना त्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठ्या जिद्दीने करतात. त्यांच्या कष्टाचा सन्मान करणे हीच जागतिक महिला दिनाची खरी ओळख आहे.तर प्रज्ञा संगीडवार यांनी महिलांनी आता केवळ घरापुरते मर्यादित न राहता सरकारी योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे.”असे म्हटले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्यामकला गावळ म्हणाल्या की,नारीशक्तीला सक्षम करणारा भाजप हाच देशातील एकमेव पक्ष आहे.
याप्रसंगी जागतिक महिला दिनाचे महत्त्व विशद करताना कल्पनाताई वालोदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या महिलांविषयक विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. सन्मानित झालेल्या महिलांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “नेहमी इतरांच्या घरी राबताना आज आमचाही सन्मान होऊ शकतो, याचा मनस्वी आनंद वाटला,” अशी भावना एका सत्कारमूर्ती महिलेने व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी पं स.सदस्य अंबिका बंजार, ममता अंबादे, वैशाली पंधरे,नगरसेविका नूतन सयाम, पिंकी कटकवार,कौसल्या कुंभरे,सरपंच अन्जुताई बिसेन,देवकी मरई ,सामाजिक कार्यकर्त्या वनिता दहिकर,लक्ष्मीताई पंचमवार,वैशाली संगिडवार,हेमलता कुंभरे, मौसमी नेताम , डीलेश्वरी बिंझाडे ,शिल्पा शर्मा,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभाताई सलामे यांनी तर उपस्थितांचे आभार शिल्पा बांते यांनी मानले.यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें