■ हजारो लोकांना महाप्रसादाचे वाटप
देवरी: उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजांची जयंती तिथीप्रमाणे शुक्रवार (ता.६ मार्च) रोजी देवरी येथील गोंड विरांगणा राणी दुर्गावती चौकात तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून एक हजारच्या जवळपास शिवसैनिक व नागरीकांना महाप्रसाद चे वाटप करण्यात आले. या जयंती कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवरायांची मुर्तीपुजन आणि गोंड महाराणी दुर्गावती यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पन करून व जय घोषाने करण्यात आली. नंतर एक हजाराच्या जवळपास उपस्थित शिवसैनिक व नागरीकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी (उबाठा)शिवसेनाचे जिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल हे होते. याप्रसंगी देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा,देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, उप तालुका प्रमुख- राजू पटले, सुहाग गिरी, गोंविद बंसोड, धर्मेन्द्र जगनीक, डालचंद मडावी, डॉ. भुमेश पटले, विभाग प्रमुख-लोकनाथ लांजेवार, प्रशांत यादव, शाखा प्रमुख- हेमराज बावनकुडे, मनोहर मेश्राम, रमेश आचले, लल्लुप्रसाद उपाध्याय, राजु क्षिरसागर, मुलचंद मोहबे, यश गिरी, अजय गिरी, दिनेश डुंभरे, बादल टेंभुनीया, घनश्याम बावने यांच्यासह देवरी तालुक्यातील शिवसैनीक युवासैनीक, महिला संघटना, किसान सैनीक व तसेच समस्त संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या जयंती सोहळ्याचे संचालन व प्रास्तावीका मध्ये तालुकाप्रमुख सुनील मिश्रा यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.त्यांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. असे म्हटले.तर उपस्थितांचे आभार शहरप्रमुख राजा भाटिया यांनी मानले. अशाप्रकारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.







