■ देवरी तालुक्यातील चिचेवाडा येथील हेमकृष्ण पिसदे या युवकाने आपल्या कुटुंबासह गाव आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे नाव केले उज्ज्वल
देवरी: चिचेवाडा येथील सर्वसाधारण शेतकरी पिसदे कुटूंबाचे सुपुत्र हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे यांनी केंद्रीय लोकसेवा. आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परिक्षेत ८४९ रैंक मिळवून उल्लेखनीय
यश संपादन केले आहे.
हेमकृष्ण पिसदे हे यापूर्वी मुंबई येथे कामगार अधिकारी व सध्या ते धामनगाव/ रेल्वे येथे तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत.
अखंड मेहनत, प्रबळ जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर हेमकृष्ण यांनी हे यश संपादन करून आपल्या कुटुंबासह चिचेवाडा गाव व देवरी तालुका आणि संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
ग्रामीण भागातील तरुणांसाठी हेमकृष्ण यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या क्षेत्राचे खासदार अँड नामदेवराव किरसान आणि आमदार संजय पुराम यांनी हेमकृष्ण यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! व त्यांच्या पुढील सेवेतून समाजात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होऊन जनतेच्या सुरक्षेसाठी ते उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.
हेमकृष्ण पिसदे यांनी यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परिक्षेची तैयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी पुढील टिप्स शेअर केल्या आहेत. जसे शासकीय सेवेत जाणे हे प्रत्येक युवक-युवतीचे आकर्षण असते. त्यासाठी युवकांनी स्वपरिक्षण करणे, स्वतःची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाच्या आहेत.
प्रशासनाच्या कामाचं स्वरूप कसं असणार आहे ह्या गोष्टी अगोदर समजून घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वळणे महत्वाचे आहे. इतर क्षेत्रातही खूप संधी आहेत. त्या संधीविषयी माहिती घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.
हेमकृष्ण पिसदे.







