◾️ मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
देवरी 27: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुजित टेटे , प्रमुख अतिथी म्हणून मराठी विभाग प्रमुख सरिता थोटे , स्वप्नील पंचभाई, योगिता कोसरकर, तनुजा भेलावे मंचावर उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन या विषयावर डॉ. सुजित टेटे यांनी मराठी भाषेची गरिमा कशी जोपासता येणार यावर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर उपस्थित अतिथींनी आपले मत मांडले.
दरम्यात या व्याख्यानमाला कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपली हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्र संचालन तेजस्विनी नंदेश्वर आणि नलू टेंभरे यांनी आभार प्रदर्शन मानले.







