देवरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा कामकाज ठप्प

शासनाच्या पुढील आदेशापर्यंत ग्रा.पं.चा कारभार ग्रा.पं. अधिकाऱ्याकडे

देवरी : राज्यातील अनेक गटग्रामपंचायतींचा पंचवार्षिक कार्यकाळ संपला आहे. त्यातच देवरी तालुक्यातील २९ गट ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

देवरी पंचायत समिती च्या मुदत संपणा-या २९ गट ग्रामपंचायतीचे नावे-

पिंडकेपार/गो., सुरतोली, देवाटोला, वडेगाव, शिलापूर, कडीकसा, ईस्तारी, लोहारा, मिसपीरी, सावली, मुरदोली, गोटाबोडी, उचेपूर, कोटजांभोरा, सर्रेगाव, परसोडी, पिंडकेपार/चि., फुटाना, बोरगाव/बा., कन्हाळगाव,भर्रेगाव, शेरपार, शिरपूर/बांध, मुरमाडी, पालांदूर/जमी., मेहताखेडा, चिपोटा, ककोडी, चिल्हाटी या ग्रा.पं. चा समावेश आहे. दरम्यान राज्य शासनाने सदर ग्रामपंचायतीं वर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशाला काही नागरिकांनी विरोध दर्शवित मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेची दखल घेत नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या प्रशासक नेमण्याचे आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली असून पुढील सुनावणी आज १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे जनतेचे लक्ष लागलेली आहे. उल्लेखनीय असे की,यामुळे कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीच्या गावगाडा ठप्प पडला आहे. देवरी तालुक्यात ५ वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या एकूण २९ गट ग्रामपंचायत आहे. मागील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका पार पडून काही ग्रामपंचायती ११ फेब्रुवारी तर काही ग्रामपंचायती १२ फेब्रुवारी २०२१ रोजी पदभार ग्रहण केला होता. त्यामुळे पंचवार्षिक कार्यकाळानुसार १२ फेब्रुवारी २०२६ पूर्वी निवडणुका घेवून नवीन ग्रामपंचायत पदाधिकारी पदारूढ होणे आवश्यक होते. पण निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने प्रशासक राज येणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

अशातच राज्य शासनाने २३ जानेवारी २०२६ रोजी परिपत्रक काढून राज्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रा.पं. वर प्रशासक नेमण्याचे निर्देश दिले होते. या आदेशा विरोधात काही नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या प्रशासक नेमण्याचे आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे तर पुढील सुनावणी आज १७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे जनतेचे लक्ष लागलेली आहे.

देवरी तालुक्यातील २९ गट ग्रामपंचायतची मुदत संपल्याने शासनाच्या पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार हे ग्रामपंचायत अधिकारी पाहतील मात्र ते कोणताही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही.
◆एस.एम. लिल्हारे,
गटविकास अधिकारी
पं.स.देवरी जि.गोंदिया

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें