फुक्कीमेटा येथील बारा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडुन मृत्यु

लोहारा/ सुरतोली:- देवरी तालुक्यातील फुक्कीमेटा येथील बारा वर्षीय रोशन श्रावणराम मेंढे याचा पाण्यात बुडुन दु:खत मृत्यु झाला. सविस्तर वृत असे कि देवरी तालुक्यातील फुक्कीमेटा येथील रहीवासी जि.प. प्रा.शाळा फुक्कीमेटा येथे वर्ग सहावित शिक्षण घेणारा रोशन श्रावणराम मेंढे वय वर्षे १२ हा आई वडीलांना एकुलता एक मुलगा गावालगतच्या तलावात दुपारी २.३० वाजे दरम्यान सायकल घेऊन गेले असता सायकल धुण्याच्या नांदात तलावातील खोल भागात गेल्याने पाण्यात बुडुन त्याचा दुखद निधन झाला. या दुखत घटनेमुळे गावात शोककळा पसरली. सदर प्रकरणाची माहीती पोलीस स्टेशन सालेकसा यांना दिली असुन पुढील चौकशी पोलीस स्टेशन सालेकसा हे करीत आहेत.

Share