गोंदिया: तलवारीने केक कापून बंदुकीतून गोळ्या झाडून वाढदिवस साजरा करण्याऱ्यांना अटक

गोंदिया ⬛️तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करुन सार्वजनिकरित्या जनमानसात जनतेमध्ये तलवार, बंदूक अश्या अवैध शस्त्रांद्वारे अवैध कृती करून जल्लोष साजरा करणाऱ्या , दहशत माजविनाऱ्या विरूध्द कारवाई

⬛️भारतीय हत्यार कायद्यान्वये तिघांविरूध्द गुन्हा दाखल

गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती प्राप्त झाली की, काही दिवसापूर्वी काही समाज कंटकांनी तलवारीद्वारे केक कापून तसेच हातात बंदूक घेऊन नाचण्याचा व वाढदिवसाचा जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित झाला असल्याचे सांगितल्याने……सदरचे प्रसारित व्हिडिओ प्राप्त करून सदर बाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली….मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांनी सन उत्सव काळात अश्याप्रकारे सार्वजनिकरित्या जनमानसात जनतेमध्ये अवैध कृती करून दहशत माजविनाऱ्याविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते… या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री. दिनेश लबडे, यांचे आदेश मार्गदर्शनाखाली प्रसारित व्हिडियोची शहानिशा करून सत्यता पडताळणी करण्यात आली असता…….इसम आरोपी नामे 1) जितेन्द्र तेजलाल येडे वय 28 वर्षे, रा.घिवारी, ता. जिगोंदिया यांनी त्याचे स्वतः चा वाढदिवस तलवारीने केक कापून, नाचून सार्वजनिकरित्या जल्लोष करीत असल्याचे तसेच इसम आरोपी नामे – 2) लोकेश झुंगरु खरे, वय 23 वर्ष, रा. किन्ही ता. जि. गोंदिया, हा आपले हातात बंदूक घेऊन नाचून आनंद साजरा करत असल्याचे तसेच आरोपी – 3) तेजलाल गोपीचंद येडे, वय-57 वर्षे, रा.धिवारी, ता.जि. गोंदिया हा त्याचे जवळील बंदुकीतून हवेत गोळीबार करुन जल्लोष करीत असल्याचे दिसून आल्याने सदर बाबत प्रतिष्ठित नागरिक यांचेकडून पडताळणी करण्यात येवून अवैध कृती केल्याचे निष्पन्न झाले आहे……यावरून वरिष्ठांचे आदेश निर्देशान्वये तिघांनाही दिनांक 17/09/2024 रोजी ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले…. व प्रसारित व्हिडियो ची शहानिशा केली असता तिघांनीही वाढदिवसाचे दिवशी सार्वजनिकरीत्या हातात तलवार, बंदूक घेऊन नाचून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केल्याचे कबूल केले आहे… अवैधरीत्या हातात शस्त्रे बाळगून अवैध कृती करून जनमानसात जनतेमध्ये दहशत माजविल्याने तिघां विरूध्द पो.ठाणे रावणवाडी येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 4, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे….. आरोपीतांना पो. ठाणे रावणवाडी पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून कायदेशीर कारवाई प्रक्रिया रावणवाडी पोलीस करीत आहेत… यातील आरोपी क्र. 3) तेजलाल गोपीचंद येडे हे माजी सैनिक असून यांचेकडे मोठ्या (12 बोर बंदुकीचा ) परवाना आहे….परंतु यांनी सन 2011 पासून सदर 12 बोर बंदुकीचा परवाना नूतनीकरण केले नसून याच बंदुकीतून मुलाचे वाढदिवसाच्या दरम्यान हवेत गोळीबार करून अवैध कृती केलेली आहे.. याद्वारे जिल्ह्यांतील जनतेला नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, सार्वजनिकरीत्या अवैध कृती करून नागरिकांना जिल्ह्यातील जनतेमध्ये दहशत पसरविणाऱ्याची गय केली जाणार नाही… अवैध कृती करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागू शकते याची दक्षता घ्यावी…..गोंदिया जिल्हा पोलीस दल जनतेच्या सेवेकरिता…. हिताकरीता सदैव तत्पर आहे..

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री. दिनेश लबडे, यांचे आदेश मार्गदर्शनात पोलीस पथक…पोलीस उप निरीक्षक शरद सैदाने, पोलीस अंमलदार राजु मिश्रा, महेश मेहर, भूवनलाल देशमुख, तुलशीदास लुटे, चित्तरंजन कोडापे, सोमेंद्र तुरकर, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, घनश्याम कुंभलवार, यांनी कारवाई केलेली आहे.

Share