आश्रम शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बिरसा हेल्थ कार्ड’

Gondia: आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता शासनाकडून ‘बिरसा हेल्थ कार्ड’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून राज्यात गोंदिया जिल्ह्यात प्रथम या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या उपक‘माचा शुभारंभ करण्यात आला.

एक पाऊल निरोगी भविष्यासाठी-आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी या संकल्पनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत हा उपक‘म प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. या ‘बिरसा हेल्थ कार्ड’द्वारे आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, आजारांची नोंद व संपूर्ण आरोग्यविषयक माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांना विद्यार्थ्यांचा पूर्व वैद्यकीय इतिहास तत्काळ उपलब्ध होऊन अचूक व जलद उपचार करणे शक्य होणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये स्वच्छता, संतुलित आहार, व्यायाम, व्यसनमुक्ती तसेच विविध आजारांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रात प्रथमच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून, हा उपक‘म विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्य विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक‘माचा अनावरण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार संजय पुराम, विनोद अग‘वाल, डॉ.मिलिंद नरोटे (गडचिरोली), जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, अतिरिक्त मु‘य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे तसेच ‘बिरसा हेल्थ कार्ड’ ज्यांच्या विशेष प्रयत्नातुन साकार झाले अशा सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. सायली चिखलीकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आश्रमशाळांमध्ये नर्स उपलब्ध झाल्यामुळे आरोग्यविषयक माहितीचे संकलन व जतन करणे अधिक सुलभ होणार आहे. तेथील विद्यार्थी निवासी असल्याने व सिकलसेलसार‘या आजारांचे प्रमाण जास्त असल्याने, आजारपणाच्या वेळी वैद्यकीय इतिहास उपलब्ध नसतो. ‘बिरसा हेल्थ कार्ड’ मुळे आता विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य माहिती सहज उपलब्ध होणार असून उपचारांमध्ये येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. 

‘बिरसा हेल्थ कार्ड’ या अभिनव उपक‘माच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. 

– उमेश काशिद

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें