ट्रकनी दुचाकीला चिरडले भीषण अपघात तरुण गंभीर

देवरी:  राज्य मार्ग २५३ वर देवरी आमगाव रस्त्यावर मुल्ला गावाजवळ आज ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान भीषण अपघात घडला. यात मोटरसायकलचा चेंदामेंदा झालेला असून मोटरसायकल स्वाराची प्रकृती चिंताजनक असून उपचार करीता आरोग्यवर्धिनी केंद्र मुल्ला येथे हलवण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार आज शनिवारी सकाळी ८ वाजता दरम्यान देवरी गोंदिया राज्य मार्गावर देवरी कडून आमगाव कडे जाणारा ट्रक क्र टीएल ०१ यूसी ०७२३ व विरुद्ध दिशेने येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच ३५ एक्यू ३४८४ याची अमोरासमोर धडक झाली. धडक एवढी जबरदस्त होती की यात मोटरसायकलच्या चेंदामेंदा झाला असून मोटरसायकलस्वार निखिल खंडारे (२३) रा. घिवारी ता. जि. गोंदिया हा गंभीर जखमी झाला. याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून जखमीला आरोग्यवर्धिनी केंद्र मुल्ला येथे उच्चारासाठी हलवण्यात आले. तर घटना स्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालक मोहम्मद अख्तर (२५) जि. प्रतापगड (उत्तर प्रदेश) याविरुद्ध मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स्टेशन देवरी करीत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें