देवरी: पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. येत्या 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होणारे पोलीस कर्मचारी रमेश कोल्हारे (ब.नं. 1050) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जनार्दन हेगडकर, सहाय्यक ठाणेदार, पोलीस स्टेशन चिचगड यांनी ध्वजारोहणाचा मान देत रमेश कोल्हारे यांचा यथोचित सन्मान केला. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान, नक्षल हल्ल्यात मौजा इस्तारी येथे शहीद झालेले घनश्याम कोरेटी यांच्या पत्नी विनाबाई कोरेटी यांना देण्यात आला होता. या उपक्रमातून पोलीस दलाने देशसेवा करणाऱ्या शहीदांच्या कुटुंबीयांप्रती आपली संवेदना आणि आदर व्यक्त केला.कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.








