देवरी /गोंदिया :महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ककोडी येथील रहिवासी कलासाधक दिनू कचरूलाल घाटा यांनी कला क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण परिसराचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांना इंदिरा कला संगीत विद्यापीठ, खैरागड (छत्तीसगड) यांच्याकडून दृश्यकला (Visual Arts) विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.
तेलंगणातील ‘रिपुसे कला’वर संशोधन:
दिनू घाटा यांनी मागील पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून आपला संशोधन प्रबंध पूर्ण केला. त्यांनी प्रा. एस. पी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
“Repousse Art : Technique and Visual Analysis of Telangana” या विषयावर संशोधन केले. या संशोधनाद्वारे तेलंगणातील पारंपरिक धातू शिल्पकलेच्या (रिपुसे तंत्र) तांत्रिक व दृश्य वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करून ती कला जागतिक पातळीवर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.
शैक्षणिक वाटचाल:
दिनू घाटा यांची शैक्षणिक कारकीर्द नेहमीच उज्वल राहिली आहे.
बी.एफ.ए. – इंदिरा कला संगीत विद्यापीठ, खैरागड एम.एफ.ए. – गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट, कोलकाता NET–JRF – राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण
देश-विदेशात कला सादरीकरण:
शैक्षणिक क्षेत्रासोबतच एक संवेदनशील कलाकार म्हणूनही दिनू घाटा सक्रिय आहेत. त्यांनी आजवर देश-विदेशातील विविध कला प्रदर्शन, कार्यशाळा व कला परिसंवादांमध्ये सहभाग घेत आपल्या कलेची छाप उमटवली आहे.या यशाबद्दल ककोडी गावासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील कला रसिक, शिक्षक, मित्रपरिवार व शुभचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.








