♦️परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने हवनकार्य व चर्चा बैठकीचे आयोजन
देवरी/लोहारा : भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदर्शचे पालन करून परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यसनमुक्त जीवनातूनच सशक्त समाजनिर्मिती कशी करता येते यावर मार्गदर्शक दिलीपकुमार सांदेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम श्रीधर शालीकराम लटये व हंसराज हेमराज टेटे (मार्गदर्शक, सुरतोली/लोहारा, ता. देवरी, जि. गोंदिया) यांच्या निवासस्थानी सकाळी ९.०० वाजता भगवंताच्या त्यागाचे हवनकार्य सुरू झाले. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास परमात्मा एक आनंदधाम, रामटेक शाखा, परसोडी-सौदंड यांच्यासोबत संलग्न असलेले सर्व मार्गदर्शक, सेवक, सेविका, बाल सेवक व बाल सेविकांनी वेळेवर उपस्थित राहून हवनकार्य, चर्चा बैठक तसेच तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमामुळे आध्यात्मिक विचारांचे आदान-प्रदान होऊन भक्तांमध्ये एकात्मता व सेवाभाव वृद्धिंगत झाली. शेकडो सेवक सेवकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढविली.








