मानव विकासची बस सेवा सुरू करण्यासाठी शिक्षकसेनेचे तहसीलदारांना निवेदन
प्रा.डॉ. सुजित टेटे
देवरी 29: आदिवासी नक्षल म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यात शाळा सुरु झाल्या परंतु विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध नसल्यामुळे कमालीची कसरत करावी लागत आहे. मानव विकासाच्या बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण विद्यार्थी शाळेपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे शिक्षक सेना देवरीच्यावतीने निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाच्या दिशानिर्दशानुसार आणि सुचनेनुसार गोंदिया जिल्हात कोरोना मुक्त गावात आणि तालुक्याच्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन तसेच पालकाच्या संमतीनुसार 15 जुलै पासून शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा विद्यांर्थ्यांच्या आगमनाने फुलले असून ज्ञानदानाचे कार्य पुन्हा सुरळीत सुरु झालेले आहे. परंतु ग्रामीण भागातील मुलींना शाळेपर्यंत पोहचविणारी मानव विकास ची बस सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समजताच देवरीच्या शिक्षक सेनेने बस सेवा सुरु करण्यासाठी तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन व विनंती केली आहे.
जिल्हात 8 वी ते 12 वीचे वर्ग मागील 10-12 दिवसापासून सुरु झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी online अभ्यासापासून वंचित होता आता बस सेवा बंद असल्यामुळे offline वर्गापासून वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून मानव विकास चे बसेस लवकरात लवकर सुरु करण्यासाठी सदर निवेदन अनिल कुर्वे जिलाध्यक्ष, सुभाष दुबे तालुका अध्यक्ष, यूवराज धुर्वे सदस्य यांनी देवरी तहसीलदार विजय बोरुडे यांना सुफूर्त केला.
यावेळी देवरीचे तहसीलदार यांनी बस सेवा सुरु करण्यासाठी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.