राज्यात पावसामुळे आठवडयात 213 जणांचा मृत्यू तर 61280

मुंबई 29: महाराष्ट्रात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमधील मृतांचा आकडा वाढून 213 पर्यंत पोहचला आहे. ज्यापैकी रायगड जिल्ह्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 8 लोक अजूनही बेपत्ता आहेत. 20 जुलै झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोकण आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये पूराचे पाणी शिरले आणि दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.

वीज पुरवठा सुरळीत करण्याचे 80 काम पूर्ण

महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितिन राऊत (Minister Dr. Nitin Raut) आज कोकणचा दौरा करून पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील. राऊत यांनी सांगितले की, पुरग्रस्त परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. आम्ही त्या ठिकाणी सोलर लॅम्प सुद्धा उपलब्ध करून देत आहोत जिथे वीज सुरळीत होणे बाकी आहे.

सर्वाधिक 95 मृत्यू रायगडमध्ये (95 Dead in Raigad)

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 213 मृत्यूंपैकी, रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त 95, सातारामध्ये 46, रत्नागिरीत 35, ठाण्यात 15, कोल्हापुरात 7, मुंबईत 4, पुण्यात 3, सिंधुदुर्गात 4 आणि पूर्व महाराष्ट्राच्या वर्धा आणि अकोलामध्ये दोन-दोन मृत्यू झाले आहेत. 8 लोक अजूनही बेपत्ता आहेत.

बहुतांश मृत्यू भूस्खलनामुळे (landslide)

52 जखमींवर विविध सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये बहुतांश मृत्यू दरड कोसळल्याने झाले, तर पुरामुळे कोल्हापुर आणि सांगतील अनेक लोकांचा मृत्यू झाला.

61,280 पाळीव जनावरे मृत्युमुखी

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून आतापर्यंत महाराष्ट्रात पावसामुळे संबंधीत घटनांमध्ये 300
पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरात एकुण 61,280 पाळीव जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडली,
ज्यापैकी बहुतांश सांगली, कोल्हापुर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.

4,35,879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

सह्याद्रीच्या रांगांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सातारा, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातून
वाहणार्‍या नद्या भरल्या, ज्यातून लोकांना बाहेर काढावे लागले. एकट्या सांगलीत 2,11,808 सह
4,35,879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Share