लोहारा / देवरी 29: शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याचा शेतातच अचानक मृत्यू झाल्याची घटना देवरी तालुक्यातील मुरपार येथे बुधवारी दिनांक २८/०७/२०२१ ला सकाळी ९. ३० वाजता घडली. देवा टेबंलाल पुराम रा. मुरपार पो. पुराडा ता. देवरी असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार देवा पुराम हे बुधवारी दि. २८/०७/२०२१ सकाळी आपल्या शेतात शेतीचे काम करण्यासाठी गेले होते. मात्र ते शेतातील बांधीत मृत अवस्थेत पडून असल्याची बाब त्यांच्या शेतालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्याने याची माहिती देवाच्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत याची माहिती देवरी पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सालेकसा येथे पाठविला. घरातील कर्त्या पुरुषांचा अचानकपणे मृत्यू झाल्याने पुराम यांच्या कुटुंबियांवर संकट ओढावले आहे. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली आहे.









