नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पामार्फत् जागतिक व्याघ्र दिन साजरा करुन जनजागृती

गोंदिया 29: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामार्फत दिनांक 29 जुलै , 2021 रोजीचे जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून दिनांक 19.07.2021 ते दिनांक 28.07.2021 पर्यत नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रातील 100 गावात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता 10 दिवस विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

उपरोक्त् जनजागृती कार्यक्रमात गावक-यांशी चर्चा करुन वन्यजीव संवर्धन, वनसंवर्धन व वाघाचे पर्यावरणातील महत्वाबाबत जनजागृती करण्यात आली.

नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बफर गावात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरीता गावा-गावात क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी लाऊडस्पिकर वरुन लोकांची जनजागृती केली.

बफर क्षेत्रातील गावाच्या मुख्य ठिकाणी वन्यजीव संरक्षण व संवर्धनाबाबत भित्ती चित्रे (पोस्टर) लावून जनजागृती केलेली आहे.

सदर जनजागृती कार्यक्रमात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचा-यांचे समुह बनवून जनजागृती करण्यात आलेली आहे. तसेच जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती करण्याकरीता नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी व अशासकीय संस्थाचे सदस्य यांनी उत्फुर्ष सहभाग नोंदविला आहे.

त्याचबरोबर नवेगाव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बफर गावातील लोकांचे सहकार्य प्राप्त झाले. वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share