तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन थाटात संपन्न

तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन आणि मार्गदर्शन कार्यक्रमात पशू पक्षी मालकांचा सन्मान

देवरी: तालुकास्तरीय पशूपक्षी प्रदर्शन ग्रामपंचायत वडेगाव येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भव्य तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रमात आमदार संजय पुराम, जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, दिपा चांद्रिकपुरे , अनिल बिसेन सभापती देवरी, सविता पुराम, कल्पना वालोडे, अंजू बिसेन , कांतीलाल पटले , संजीवनी वाघमारे ,राजकुमाररहांगडाले आदी अतिथी उपस्थित होते.

यामधे संकरित गाय गटात भूमेश्वर भुते मुल्ला, सुधारित देशी गाय गटात हंसराज बेलपाडे मुल्ला , देशी गाय गटात रवींद्र आंबागडे मुल्ला , बैल जोडी गटात मनोहर सोनवणे पंढरपूर , शेळी गटात कमल बेलावे या पशू मालकांनी प्रथम क्रमांक देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालक बांधवांना आधुनिक तंत्रज्ञान, पशुसंवर्धनाच्या सुधारित पद्धती, तसेच सरकारी योजनांची माहिती मिळाली.

चांगल्या प्रजातींच्या जनावरांची माहिती व निवड करण्यास मदत कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान , पशुंचे आरोग्य व्यवस्थापन व योग्य आहाराचे महत्त्व, बाजारपेठ संधी व शासनाच्या मदतीबाबत मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि आधुनिक पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महेंद्रकुमार हरीणखेडे पशूधन विकास अधिकारी पंचायत समिती देवरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

Share