अनुसूचित जमातीच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

Deori: अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील मुला मुलीना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळावी, आणि त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून “परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे या योजने अंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 40 गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्याथ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसुचित जमातीच्या 40 विद्याथ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.शिष्यवृत्ती मध्ये शिक्षण व परिक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक/ इतर खर्च विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आरोग्य विमा यांचा समावेश असणार आहे. शैक्षणिक आकस्मिक खर्च, युएएस व इतर देशांसाठी (यूके वगळून) | 1500 यूएस डॉलर तर युकेसाठी 1100 जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल.

लाभार्थी विद्याथ्यांच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा 8.00 लाख रुपये तसेच विद्यापीठाची क्युस वर्ल्ड रेंकिग मर्यादा 200 च्या आत आसने बंधनकारक आहे विहीत निकषानु‌सार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्याथ्यांना कुटुंबाची उत्पन्न मर्यादा रुपये 10 लाख पर्यंत शिथिल केली जाईल तर क्यूस वर्ल्ड रैंकिंग मर्यादा 200 पासून पूढे चढत्या क्रमाने 300 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल, परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक TOEFL किवा IELTS यासारख्या प्रवेश परिक्षा उत्तीर्ण होणे विद्याथ्यांना अनिवार्य आहे

दरम्यान, शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठों विहीत नमुन्यातील आवेदन https:fs. maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जातील निवड समितीव्दारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्याथ्यांची निवड केली जाईल योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी
सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात सदर योजनेचा अनुसुचित जमातीच्या विद्याथ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन… प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी, जि.गोंदिया यांनी केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें