♦️लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
देवरी: लायनेस क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रुप रिसॉर्ट येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला क्लबच्या सदस्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.या पदग्रहण सोहळ्यात पदग्रहण अधिकारी तथा पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पूर्णिमा भाले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी उर्मिला परिहार यांनी देवरी लायनेस क्लबच्या नवनियुक्त अध्यक्षा म्हणून पदाची शपथ स्वीकारली. आपल्या मनोगतात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत महिला सक्षमीकरण, आरोग्य व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सरोज शेन्द्रे, रिजन-१ प्रतिनिधी गौरी देशमुख तसेच माजी अध्यक्षा सुलभाजी, शिल्पाजी, संगीताताई, वनिताताई, शिलाताई, लक्ष्मीजी, पुजाजी व डॉ. वर्षा गगणे यांची उपस्थिती लाभली.
तसेच सचिवपदी शीतल सोनवणे व कोषाध्यक्षपदी ममता रोकडे यांनी पदाची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुषमा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. वर्षा गगणे यांनी केले. पदग्रहण सोहळा उत्साह व आनंदाच्या वातावरणात पार पडला.







