देवरीत चैत्र नवरात्र निमीत्त मॉ धुकेश्वरी मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवरी : येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण चैत्र नवरात्र निमीत्त ३० मार्च ते ०६ एप्रिल पर्यंत दर दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
यात ३० मार्चला सकाळी आठ वाजता गुढीपाडवा निमीत्त नगरात भव्य शोभायात्रा व सायंकाळी मंदिरात घटस्थापना, ३१ मार्चला रात्री ७.३० वाजता तालुकास्तरीय भजन स्पर्धा, १ एप्रिलला रात्री ७.३० वाजता १३ वर्षाखालील मुलामुलीं साठी धार्मिक एकल नृत्य व सामुहिक नृत्य स्पर्धा, २ एप्रिलला रात्री ७.३० वाजता १३ वर्षांवरील सर्वांसाठी धार्मिक एकल नृत्य व सामुहिक नृत्य स्पर्धा, ३ एप्रिलला रात्री ७.३० वाजता दांडिया स्पर्धा, ४ एप्रिलला रात्री ७.३० वाजता आधीशक्ती भजन मंडळ तर्फे भजन संध्या, ५ एप्रिलला दुपारी तीन वाजता अष्टमी हवन, सायंकाळी सहा वाजता हार स्पर्धा, थाली सजावट स्पर्धा व रांगोळी स्पर्धा, रात्री ७.३० वाजता सर्वांसाठी धार्मिक वेशभूषा ॐ स्पर्धा आणि ६ एप्रिलला सकाळी आठ वाजता श्रीराम नवमी निमीत्त नगरात शोभायात्रा, सायंकाळी ५.३० वाजता साडी वितरण, रात्री आठ वाजता ज्योत विसर्जन व महाप्रसाद वितरण होणार आहे. तसंच भक्तांच्या मनोकामनासाठी ज्योत कलश आरक्षीत करणे सुरु असून तुपाची ज्योत ११०१/- रुपये तर, तेलाची ज्योत ८०१/- रुपये आहे. तरी सर्व कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष अँड. प्रशांत संगीडवार, सचिव सुशील शेंद्रे आणि उत्सव समितीने केले आहे.#

Share