
आता जंगल सफारी करण्यासाठी करू शकता ऑनलाईन बुकिंग
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेल्या कोका तन्यजीव अभयारण्यात १ ऑक्टोबरपासून जंगल सफारीला सुरुवात झाली. यास पर्यटक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विद्यार्थ्यांसह बाहेरील पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटत आहेत. सफारीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा आहेत, परंतु पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंगकडे पाठ फिरविली असून, ऑफलाइन स्पॉट बुकिंगला पसंती दर्शविली आहे. पाच महिन्यांत ४८३ पर्यटकांनी ऑफलाइन, तर केवळ २६ पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग केली. यातून प्रशासनाला लाखाची कमाई झाली आहे.
२०१५ मध्ये उदयास आलेला कोका वन्यजीव अभयारण्य १० हजार १३ हेक्टरमध्ये विस्तारला आहे. पर्यटकांना वन्यजीवांसह निसर्गाचा सहवास लाभावा, यासाठी तलाव, नाले व डॉगर टेकड्यांसह घनदाट जंगलातून सफारीचे मार्ग तयार करण्यात आले. सफारीसाठी सुमारे ५२ किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. अभयारण्यात १ ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यतच्या पाच महिन्यांत पर्यटनातून १ लाख १५ हजार ५०० रुपयांची कमाई प्रशासनाला झाली.
विद्यार्थ्यांसह ४८३ पर्यटकांनी 66 घेतला निसर्गानुभव
कोका वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ४३९ पर्यटकांनी वन्यजीवांसह निसर्गानुभव घेतला. यात ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुमारे २० जिप्सीतून घडलेल्या जंगल सफारीमुळे गाइड व जिप्सी चालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सर्वाधिक पर्यटकांच्या भेटी
पर्यटकांनी हिवाळ्याला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात १५२ पर्यटकांनी भेट दिली, तर डिसेंबर महिन्यात १४८ पर्यटकांनी निसर्ग भ्रमंतीचा आनंद लुटला.
उन्हाळी जंगल सफारीला मिळतोय प्रतिसाद
वन्यजीव पाहण्याची हौस अनेक पर्यटकांना असते. त्यामुळे अशा पर्यटकांकडून उन्हाळी पर्यटनाला गर्दी होते. उन्हाळ्यात पानगळ होऊन जंगल निष्पर्ण होते. जंगलात दूरवर असलेले प्राणी सहज दिसतात. दरवर्षी कोका अभयारण्यात उन्हाळी पर्यटनात वाढ होत असते. यंदाही एप्रिलपासून पर्यटनात वाढ होण्याचा अंदाज अभयारण्य प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने तयारी सुरु आहे.