
चित्रकुट राममंदिर देवस्थानात नवमी अखंडज्योत,किर्तन व गोपालकाल्याचे आयोजन
■ संत भोजराज बाबा समिती,देवरी ने २६ वर्षापूर्वी स्थापना केलेल्या श्री राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
देवरी : देवरी ते सेडेपार रोडावरील चित्रकुट देवस्थान राममंदिर येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुध्दा संत भोजराज बाबा समिती देवरी च्या वतीने श्रीराम नवमी निमित्य भव्य यात्रा,अखंड ज्योत,किर्तन व भव्य गोपालकाल्याचे आयोजन सोमवार (ता.३१ मार्च) रोजी सकाळी ११.३० वाजेपासून तर मंगळवार (ता.१ एप्रील) रोजी सायंकाळी ५ वाजे पर्यत करण्यात आले आहे. श्रध्देने या मंदिरात येणा-या अनेक लोकांच्या मनातील इच्छा,आकांक्ष पूर्ण झाले आहेत. हे विशेष
श्री संत विदेही मोतीराम बाबा व सद् गुरूमाऊली अमररत्न तवाडे बाबा यांच्या आशिर्वाद व कृपेने वर्ष १९९९ च्या श्रीराम नवमीला भगवान श्रीराम,सिता व लक्ष्मण च्या मुर्तीची स्थापना केलेल्या मंदिरात आयोजीत या कार्यक्रमाचे उद्धाटन देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके यांच्या हस्ते आणि या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.या प्रसंगी देवरी पं.स.चे सभापती अनिल बिसेन, जि.प.च्या माजी महिला व बालकल्याण समिती सविताताई पुराम,भा.ज.प.चे संघटनमंत्री विरेन्द्र अंजनकर सर, अर्बन बैंकेचे संचालक महेश जैन,जि.प.सदस्य उषाताई शहारे,कल्पनाताई वालोदे, संदिप भाटीया व सामाजीक कार्यकर्ता पिन्टु अग्रवाल यांच्यासह देवरी शहरातील प्रतिष्ठीत नागरीक महिला व पुरूष बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. या मंदिरात येणा-या अनेक लोकांच्या मनातील इच्छा,आकांक्ष पूर्ण झाले आहेत
तरी या दोन दिवसीय कार्यक्रमात सोमवारी सकाळी ११.३० वाजे दिप प्रज्वलन,दुपारी ३ ते ४ वाजे हवनविधी,सांयकाळी ५ ते ७ वाजे हरिपाठ, रात्री ९ वाजता गोंदियाचे गुलाब बिसेन महाराज यांच्या वाणीद्वारे किर्तन तसेच मंगळवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजे रामधुन,दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांचे आगमण व स्वागत,दुपारी १ ते ३ वाजता सद् गुरूमाऊली अमररत्न तवाडे बाबा यांच्या उपस्थितीत गोपाल काला नंतर सायंकाळी ५ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे.
तरी या दोन दिवसीय आयोजीत श्रीराम नवमी निमित्य आयोजीत कार्यक्रमात देवरी व परिसरातील जास्तीत जास्त भावी भक्तांनी उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत भोजराज बाबा समिती व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष संत भोजराज बाबा कनोजे,उपाध्यक्ष उत्तम लांजेवार,सचिव संजय दरवडे,सहसचिव ओमप्रकाश रामटेके व कोषाध्यक्ष सुनील चोपकर यांनी केले आहे.