भदंत राहुल बौद्ध विहार सांस्कृतिक समिती,परसटोला येथे “पंधरावा वर्धापन दिन” उत्साहात साजरा

देवरी: स्थानिक भदंत राहुल बौद्ध विहार सांस्कृतिक समिती परसटोला येथे पंधरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विशेष अतिथी म्हणून या आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय पुराम प्रमुख पाहुणे म्हणून देवरी नगराचे नगराध्यक्ष संजू ऊईके, रूप रिसोटचे मालक यादोभाऊ पंचवार, प्राचार्य जी.एम. मेश्राम, प्राचार्य चरणदासजी उंदीरवाडे, प्राचार्य महेंद्र मेश्राम, ज्येष्ठ नेते संतोष तिवारी, तागडे,ठेकेदार शंकरजी रहांगडाले, विहाराचे मार्गदर्शक विलास शिंदे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या वर्धापन दिनानिमित्त नवनियुक्त आमदार माननीय संजय पुराम व देवरी नगराचे नगराध्यक्ष यांचे शाल आणि मोमेंटो देऊन विहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
सर्वांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर अचूकपणे करावा असे मा. संजयजी पुराम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.सर्व समाज बांधवांकरिता भीम गीतांचा कार्यक्रम व सह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश लाडे सर व आभार प्रदर्शन विलास शिंदे यांनी केले.

Share